fbpx

लक्ष्यवेध PROFILE

लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट ऑफ लिडरशीप अँड एक्सलन्स ही संस्था वैयक्तिक आणि व्यावसायिक विकास प्रशिक्षण क्षेत्रात वर्ष २००८ पासून कार्यरत आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी लक्ष्यवेधच्या विविध उपक्रमांमार्फत आपल्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणले आहे.

महाराष्ट्रीय उद्योजकांचा दीपस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लक्ष्यवेध इन्स्टिट्यूटचे विविध उद्योजकता विकास प्रशिक्षणक्रम हजारो उद्योजकांनी अटेंड केले आहेत. उद्योजकांना त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात जाणवणाऱ्या निरनिराळ्या अडचणींसंदर्भात लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट विविध प्रशिक्षण आणि उपाययोजना राबवत असते. हजारो उद्योजकांनी आतापर्यंत लक्ष्यवेध इन्स्टिट्यूटच्या मदतीने त्यांच्या व्यवसायाचा विकास घडवून आणला आहे.

आज महाराष्ट्रात व्यवसाय प्रशिक्षण क्षेत्रात लक्ष्यवेधचे वेगळे आणि विश्वसनीय स्थान प्रस्थापित झाले आहे. लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट खाजगी आणि सरकारी संघटनांसोबत सुद्धा विविध स्तरांवर त्यांच्या विशिष्ट गरजांनुसार ट्रेनिंग आणि कन्सल्टंसी सेवा पुरवण्यात कार्यरत आहे.

“लोकांना अर्थपूर्ण आणि समृद्ध जीवन जगण्यास सक्षम करणे” या एकमेव ध्यासाने लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट कार्यरत आहे.

लक्ष्यवेधचे उद्दिष्ट आहे की, महाराष्ट्र राज्याची आर्थिक भरभराट व्हावी आणि महाराष्ट्रातील लघुउद्योजकांनी त्यामध्ये सिंहाचा वाटा उचलावा. जेणेकरून देशाच्या उन्नतीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात हातभार लागेल. महाराष्ट्रीय उद्योजकांची ओळख जगाच्या पाठीवर ‘तत्त्वनिष्ठ’ आणि ‘उत्कृष्ट’ उद्योजक अशी व्हावी, असा लक्ष्यवेधचा मानस आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्रीय उद्योजकांना अर्थपूर्ण आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ बनून लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट अविरतपणे कार्यरत आहे. वर्ष २०३२ पर्यंत ₹१०० कोटी एवढी वार्षिक आर्थिक उलाढाल करणारे १०० व्यवसाय उभारण्यात योगदान करण्याची लक्ष्यवेध इन्स्टिट्यूटची महत्वाकांक्षा आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी लक्ष्यवेधची टीम उत्साहाने आणि वचनबद्धतेने कार्यरत आहे.

वर्ष २०२० पर्यंत प्रत्यक्ष स्वरूपात शेकडो प्रशिक्षणक्रम आणि कार्यशाळा यशस्वीपणे आयोजित केल्यानंतर लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट डिजिटल माध्यमातून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील उद्योजकांपर्यंत पोहोचत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात महाराष्ट्रीय उद्योजक निर्माण व्हावे, यासाठी हा अभिनव उपक्रम.

लक्ष्यवेध टीमतर्फे लक्ष्यवेधी परिवारामध्ये आम्ही आपले सहर्ष स्वागत करतो!

लक्ष्यवेध इन्स्टिट्यूटची पायाभूत विचारधारा

लक्ष्यवेध इन्स्टिट्यूटचा असा ठाम विश्वास आहे की, प्रत्येक व्यक्तीला परिपूर्ण जीवन जगण्याचा अधिकार आहे. परिपूर्ण जीवन जगणे म्हणजेच ‘अर्थपूर्ण’ आणि ‘समृद्ध’ जीवन जगणे. एखादी व्यक्ती ‘अर्थपूर्ण जीवन’ जगते जेव्हा त्या व्यक्तीला आपल्या जगण्यामागील खरे कारण सापडते आणि त्यातून तिला आंतरिक आनंद मिळतो. त्याचप्रमाणे जेव्हा व्यक्तीच्या बाह्य महत्त्वाकांक्षा साध्य होतात ‘समृद्ध जीवन’ तेव्हा ती समृद्ध जीवन जगू लागते. म्हणूनच अर्थपूर्ण जीवन म्हणजे आंतरिक आनंद आणि समृद्ध जीवन म्हणजे बाह्य यश असे आपण म्हणू शकतो. सतत परिवर्तित होणाऱ्या आजच्या या खवळलेल्या तसेच प्रागतिक युगात, आपल्या आंतरिक आनंदाशी तडजोड न करता आणि आपल्या दुर्दम्य महत्वाकांक्षाचा सातत्याने मागोवा घेणे म्हणजेच अर्थपूर्ण आणि समृद्ध जीवन, ज्याला आम्ही लक्ष्यवेधी जीवन म्हणतो.

परंतु आपली औपचारिक शिक्षण पद्धती आणि सामाजिक जडणघडणीद्वारे आपल्याला अर्थपूर्ण आणि समृद्ध जगणे शिकवले जात नाही. आपल्याला नकळतपणे तडजोड करून जीवन जगण्यास प्रवृत्त केलं जातं. याचा दूरगामी परिणाम असा की आपल्या समाजाची प्रगती होत नाही आहे.

लक्ष्यवेध ही परिस्थिती बदलून महत्वपूर्ण परिवर्तन घडवून आणण्यासाठी वचनबद्ध आहे. लक्ष्यवेधचे अस्तित्वात असण्यामागाचे प्राथमिक कारण आहे, लक्ष्यवेध इन्स्टिट्यूटचा पायाभूत उद्देश तो म्हणजे, ‘लोकांना अर्थपूर्ण आणि समृद्ध जीवन जगण्यास सक्षम करणे!’

आम्ही जे करतो ते आमच्या या पायाभूत उद्देशाशी संलग्न आहे. आमचा पायाभूत उद्देश हा आमच्यासाठी एका दिशादर्शक दिपस्तंभासरखा आहे, जो आम्हाला सदैव मार्गदर्शन करतो. लक्ष्यवेधमध्ये आम्ही आमच्या पायाभूत उद्देशाला अनुसरून आमचे जीवन जगण्यासाठी प्रेरित आहोत, ज्यामुळे आमचे जीवन अधिक अर्थपूर्ण आणि समृद्ध बनते.

लक्ष्यवेधचा पायाभूत उद्देश

‘लोकांना अर्थपूर्ण आणि समृद्ध जीवन जगण्यास सक्षम करणे !’

लक्ष्यवेधची पायाभूत मूल्य

आमची पायाभूत मुल्ये परिभाषित करतात की आम्ही कोण आहोत आणि आपण कशाबाबतीत ठाम आहोत. आमची पायाभूत मुल्ये आम्हाला नैतिकतेबद्दल मार्गदर्शन करतात. आम्ही आमच्या मूल्यांनुसार वागण्यासाठी वचनबद्ध आहोत. परिणाम काहीही असोत, आम्ही त्यांच्याशी कधीही तडजोड करणार नाही. आमची मूल्ये आमच्यासाठी नैतिक होकायंत्रा सारखी आहेत, काय योग्य आणि काय चूक आहे हे नेहमीच आम्हाला सांगतात.

आम्ही ज्या पाच मूल्यांना अनुसरून कार्य करतो ती खालीलप्रमाणे आहेत:

प्रामाणिकपणा

परिणाम काहीही असोत आम्ही नेहमी आमच्या संभाषणामध्ये, वागणुकीमध्ये आणि कृतीमध्ये प्रामाणिक आहोत.

उत्कृष्ट सेवा

लोकांच्या जीवनात उत्कृष्टतेने मुल्य योगदान करण्यासाठी आम्ही मनापासून वचनबध्द आहोत.

शोध स्वतःचा

आमचे मिशन जगण्यासाठी आम्ही प्रत्येकवेळी आपल्या क्षमतांच्या पलीकडे जातो आणि स्वतःमधील खऱ्या क्षमतांचा शोध घेतो.

सिनर्जी

सांघिक कामगिरी, मनमोकळेपणा, वेगळेपण साजरे करणे व नवनवीन कल्पना प्रत्यक्षात आणणे, यावर आमचा ठाम विश्वास आहे.

उत्साह

आम्ही आनंदी, उत्साही आणि सदाप्रफुल्लीत राहून अलौकिक अनुभवाची निर्मिती करतो.

आमची पायाभूत विचारधारा आमच्या संघ-सदस्यांना आमच्या नैतिकतेबद्दल मार्गदर्शन करते. आम्ही आमच्या विचारधारेनुसार कार्य करण्यास वचनबद्ध आहोत.
आमचा पायाभूत उद्देश आणि आमची पायाभूत मूल्ये आमच्या संस्थेची विचारधारा दर्शवतात. आमची विचारधारा ही आमच्या संस्थेचा पाया आहे. आमची पायाभूत विचारधारा भविष्यातदेखील कायम राहील. ती कधीही बदलणार नाही. आमची पायाभूत विचारधारा आम्हाला, आम्ही कोण आहोत आणि आम्ही कोणत्या बाबतीत ठाम आहोत याची आठवण करून देते. उर्वरित सर्व गोष्टी आम्ही बदलण्यास तयार आहोत, परंतु आम्ही आमच्या पायाभूत विचारधारेबरोबर आम्ही कधीही तडजोड करणार नाही.

लक्ष्यवेध संस्थापक

अतुल राजोळी
अतुल राजोळी उद्योजक, बेस्ट सेलिंग लेखक, लीडरशिप कोच, महाराष्ट्रातील आघाडीचे जीवन व व्यवसाय स्ट्रॅटेजिस्ट आहेत. वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रशिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य संस्था, लक्ष्यवेध इन्स्टिट्यूटचे ते संस्थापक आहेत. संघटनात्मक नेतृत्व, व्यवसाय धोरण आणि वैयक्तिक उत्कृष्टता या क्षेत्रातील नामांकित व्यक्ती. ते वर्ष २००८ पासुन अधिक काळापासून महाराष्ट्रभरातील हजारो उद्योजकांसाठी कोच आणि ट्रेनर म्हणून कार्य करत आहेत.

लक्ष्यवेध टिम

विकास भोईर

अनिश विश्वासराव 

श्रेयस तळेकर 

सुयश सागर 

निलेश मालोरे 

योगेश खेडकर

संचिता उतेकर 

चैताली पेडणेकर 

लक्ष्यवेधी परिवार

लक्ष्यवेध इन्स्टिट्यूटमार्फत राबवल्या जाणाऱ्या प्रशिक्षणक्रम पूर्ण करणाऱ्या व्यक्तीला लक्ष्यवेधी असे संबोधिले जाते. प्रत्येक लक्ष्यवेधी आपल्या नावाआधी ‘लक्ष्यवेधी’ हे विशेषण अभिमानाने लावतो. प्रत्येक लक्ष्यवेधी हा लक्ष्यवेधी जीवन जगण्यासाठी, म्हणजेच अर्थपूर्ण आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी वचनबद्ध असतो. आज अश्या असंख्य लक्ष्यवेधींचा, महाराष्ट्रीय उद्योजकांचा भलामोठा समुदाय निर्माण झाला आहे. ज्याला लक्ष्यवेधी परिवार असं संबोधण्यात येतं.

समस्त लक्ष्यवेधींना सतत प्रगती पथावर राहण्यासाठी आणि वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात जाणवणाऱ्या निरनिराळ्या प्रश्नांवर मार्गदर्शन करण्यासाठी लक्ष्यवेध इन्स्टिट्यूटद्वारे लक्ष्यवेधी परिवारासाठी विविध मार्गदर्शनपर उपक्रम डिजिटल माध्यमातून राबवले जातात. दर महिन्याला होणारे हे डिजिटल कार्यक्रम खालीलप्रमाणे असतात:

उल्लेखनीय व्यावसायिक कामगिरी करणाऱ्या
लक्ष्यवेधींबरोबर लाईव्ह संवाद 

महाराष्ट्रातील व्यवसाय क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींबरोबर लाईव्ह मुलाखत  

दर महिन्याला लक्ष्यवेधचे संचालक अतुल राजोळी यांचे लाईव्ह वेबिनार मार्फत सर्व लक्ष्यवेधींना मार्गदर्शन

विशिष्ट क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींकडून थेट मार्गदर्शन

अतुल राजोळी यांच्याकडून लक्ष्यवेधींच्या व्यावसायिक प्रश्नांना प्रॅक्टिकल उत्तरे

समस्त लक्ष्यवेधींनी मिळून सामाजिक योगदान करण्याच्या हेतूने हाती घेतलेले विशिष्ट सामाजिक प्रोजेक्ट

Scroll to Top
Scroll to Top