lakshyavedh.udyogjatra@gmail.com

slider slider slider slider slider

तयार रहा. लवकरच येत आहोत 

days
hours
minutes
seconds

about

जागतिक अर्थव्यवस्था आणि भारत

सध्या जग गतिमान परिवर्तनाला सामोरे जात आहे. जागतिक अर्थव्यवस्था संथावली आहे. बलाढ्य व्यावसायिक कंपन्या बाजारपेठेत आपले अस्तित्त्व टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करत आहेत. मार्केटमध्ये अस्थिर परिस्थिती निर्माण झाली आहे. रिअल इस्टेट सेक्टर अडचणीच्या काळातून चालला आहे. ऑटोमोबाईल इंडस्ट्री मध्ये विक्री दर ५० टक्क्यांपेक्षा खाली उतरला आहे. तंत्रज्ञान प्रचंड वेगात बदलत आहे. रिटेल सेलसुद्धा बऱ्यापैकी खालावला आहे. बहुतांश लोकांमध्ये हि मंदीची लाट असल्याची समजूत निर्माण झाली आहे. लघु उद्योग आर्थिकरीत्या तग धरून ठेवण्यासाठी कठीण काळातून जात आहेत.

अश्या या खवळलेल्या युगात भारतच्या केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांचे उद्दिष्ट आहे की पुढच्या पाच वर्षांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला ५ ट्रिलियन ( ५ सहस्त्र अब्ज) वर न्यायचे. हे ध्येय अश्या बिकट परिस्थितीमध्ये साध्य करणे अवघड आहे पण अशक्य नाही!

भारतातील लघु उद्योगांची सद्यपरिस्थिती

भारत देशाच्या एकूण प्रगतीमध्ये लघु उद्योगांचा वाट फार मोठा आहे. देशात एकूण ६ करोड पेक्षा जास्तं लघु उद्योग कार्यरत आहेत. ४५ % पेक्षा जास्तं रोजगार लघु उद्योगांद्वारे निर्माण होतात. ४५ % पेक्षा जास्तं निर्यात लघु उद्योगांद्वारे होते. देशाच्या GDP मध्ये ३७ % पेक्षा जास्तं योगदान लघु उद्योगांद्वारे होते. लघु उद्योगांच्या बाबतीत महारष्ट्र राज्य देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. लक्ष्यवेध इंस्टीट्युटचे असे ठाम मत आहे की भारत देशाच्या अर्थ व्यवस्थेची जर भरभराट करायची असेल, तर लघु उद्योगांना प्रगती पथावर आणणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

about
about

लघु उद्योगांची प्रगती.. देशाचा विकास

लघु उद्योगांचा जर विकास झाला तर देशाच्या GDP ला बहुमुल्य योगदान होईल. मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल. निर्यातीचे प्रमाण वाढून भारतीय चलन आंतरराष्ट्रीय पातळीवर मजबूत होईल. लघु उद्योगांच्या विकासामुळे इतर छोटे मोठे उद्योग सुद्धा विकसित होतात आणि एक प्रबळ व्यावसायिक इकोसिस्टिम तयार होण्यास मदत होते. लघु उद्योगांच्या आर्थिक उन्नतीमुळे त्या इंडस्ट्रीचासुद्धा विस्तार होण्यास मदत होते. जेव्हा एखादा व्यवसाय यशस्वी होतो तेव्हा आपोआपच त्या व्यवसायाद्वारे सामाजिक योगदानसुद्धा होण्यास मदत होते, त्याचबरोबर यशोगाथांच्या स्वरूपात लोकांसाठी आदर्श असे प्रेरणास्थान आपल्या देशाला लाभतात.

लघु उद्योग आणि आव्हाने

लघु उद्योगांच्या समोर प्रगतीच्या संधी आहेत परंतु त्याच बरोबर अडचणीसुद्धा आहेत. सतत बदलणाऱ्या या गतिक युगात आपली उत्पादने व सेवा बाजारपेठेत सगळ्यांसमोर प्रभावीपणे मांडणे, योग्य संधीचा शोध घेणे, आणि आपलं व्यवसाय वाढीसाठी प्रयत्नशील असणे हे कोणत्याही लघु उद्योजकासाठी एक फार मोठे आव्हान आहे. लघु उद्योगांचे उत्पादन व सेवा उत्तम दर्जाचे असूनसुद्धा बऱ्याच वेळा हव्या त्या व्यावसायिक संधीचा त्यांना शोध घेणे कठीण जाते. मार्केटमध्ये त्यांच्या उत्पादनाला मागणी असूनसुद्धा योग्य मंडळींपर्यंत पोहोचणे लघु उद्योजकांना अवघड जाते. मार्केटिंग आणि सेलिंग तंत्र यांच्या अभावामुळे लघु उद्योग प्रगतीपासून वंचित राहतात. लघु उद्योजकांकडे आर्थिक भांडवलाची कमतरता असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जाहिरातसुद्धा करणे त्यांना अशक्य असते. अश्या परिस्थितीमध्ये लघु उद्योजकांसाठी एक असं हक्काचं व्यासपीठ असणे गरजेचे आहे, जिथे सर्व प्रकारचे उद्योजक एकत्र येतील, जिथे ते एकाच वेळी असंख्य संभाव्य ग्राहकांसमोर आपले उत्पादन व सेवा, कमीतकमी आर्थिक गुंतवणुकीमध्ये सादर करू शकतील. जिथे लघु उद्योजक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यवसाय विकासाच्या संधी शोधू व निर्माण करू शकतील.

उद्योजकांच्या याच आव्हांनाला लक्षात घेऊन लक्ष्यवेध इंस्टीट्युट घेऊन येत आहे... लक्ष्यवेध उद्योग जत्रा

about

जत्रा

'जत्रा' या शब्दाची व्याख्या पुढीलप्रमाणे आहे. एखादा सण अथवा ग्रामदेवतेचा उत्सव पंचक्रोशीतील (आपल्या गावाच्या आसपास असणाऱ्या गावांचा परिसर) लोकांनी एकत्र येऊन साजरा करण्याच्या पद्धतीला जत्रा किंवा मेळा असे म्हणतात. लोकसंपर्क वाढविणे हा जत्रेचा मुख्य उद्देश असतो. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ प्रत्येक गावामध्ये अशी प्रथा आढळते. महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये लोकसंपर्काच्या ज्या अनेक पद्धती आहेत त्यापैकी जत्रा ही एक अतिशय महत्त्वाची पद्धती आहे. अशा या जत्रेत लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्व स्तरातील, सर्व जाती-धर्मातील समुदाय या जत्रेत मोठ्या आनंदाने सहभागी होताना दिसतात. या अशा जत्रेतून सामाजिक एकोपा जपला जातो. ह्या धार्मिक कारणांबरोबरच आर्थिक व व्यावहारीक उलाढालींसाठी सोयीचे केंद्र असते. गावागावात आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक इकोसिस्टिम निर्माण करण्यामध्ये जत्रा महत्त्वाची भूमिका बजावते.

COME.. CONNECT.. CREATE.. CAPITALISE...

 • 20 +

  Corporate Companies

 • 100 +

  Exhibitors

 • 1000 +

  Lakshyavedhis

 • 5000 +

  Visitors

उद्योजकांची एकजूट.. संधींची लयलूट..! लक्ष्यवेध उद्योग जत्रा

लक्ष्यवेध उद्योग जत्रा हा एक असा अद्वितीय उपक्रम आहे, ज्याद्वारे सर्व पातळीच्या उद्योजकांना, प्रोफेशनल व्यक्तींना, तज्ञांना, ग्राहकांना, पुरवठादारांना, बँकांना आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिक संघटनांना एका छत्राखाली एक आगळेवेगळे व्यासपीठ प्राप्त होईल. हि सगळी मंडळी एकमेकांना समोरासमोर भेटून, एकमेकांच्या उत्पादन आणि सेवांचा प्रत्यक्ष अनुभव घेतील. जेणेकरून उद्योजकांना व्यवसाय विकासाच्या असंख्य संधी निर्माण होतील. परिणाम स्वरूपी सगळ्यांची उन्नती होऊन, अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. ज्याप्रमाणे गावागावात जत्रेमुळे आनंददायी वातावरणात जनसंपर्क वाढून व्यावसायिकांमध्ये आर्थिक उलाढाल होण्यास मदत होते, त्याचप्रमाणे लक्ष्यवेध उद्योग जत्रा मध्ये, सगळी मंडळी एका सकारात्मक वातावरणात एकत्र येऊन, एकमेकांशी संवाद साधतील, नवीन संधी निर्माण करतील, आणि व्यवसाय विकास साधतील.

लक्ष्यवेध उद्योग जत्राचे पहिले पर्व आयोजित केले जाणार आहे

शनिवार आणि रविवार दिनांक १६ व १७ नोव्हेंबर रोजी, टिप-टॉप प्लाझा, ठाणे येथे.

प्रमुख आकर्षण

blog

१०० पेक्षा जास्त व्यवसायांचे प्रदर्शन

लक्ष्यवेध उद्योग जत्रामध्ये निरनिराळ्या क्षेत्राचे आणि पातळीचे उद्योजक आपल्या उत्पादन आणि सेवांचे प्रदर्शन आणि प्रात्यक्षिक सादर करतील.

सहभागी उद्योजकांची यादी 
blog

बलाढ्य कंपन्याचा सहभाग

लक्ष्यवेध उद्योग जत्रामध्ये बलाढ्य कंपन्यासुद्धा सहभागी होतील ज्यामुळे लघु उद्योकांचा त्यांच्या बरोबर संपर्क प्रस्थापित होईल.

blog

बँकाद्वारे अर्थसहाय्य संदर्भात मार्गदर्शन

बँकासुद्धा लक्ष्यवेध उद्योग जत्रा मध्ये सहभागी होतील जेणेकरून लघु उद्योजकांना आर्थिक मदतीसाठी चांगल्या संधी उपलब्ध होतील.

blog

आंतरराष्ट्रीय व्यावसायिक संघटनाचा समावेश

आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत व्यावसायिक संघटनासुद्धा 'लक्ष्यवेध उद्योग जत्रा' मध्ये सामील होतील आणि उद्योजकांना भारताबाहेरील औद्योगिक संधीं काबीज करण्यास मदत होईल.

blog

दिग्गजांबरोबर परिसंवाद

महाराष्ट्रातील यशस्वी उद्योजक लक्ष्यवेध उद्योग जत्रामध्ये सामील होतील आणि उद्योजकांशी थेट संवाद साधतील आणि यशाचे कानमंत्र देतील.

सहभागी दिग्गजांची यादी
blog

तज्ञांद्वारे मार्गदर्शन

निरनिराळ्या विषयांचे उच्च श्रेणीतील तज्ञ लक्ष्यवेध उद्योग जत्रामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असतील.

blog

उत्पादन अनावरण आणि लोकार्पण

लक्ष्यवेध उद्योग जत्रामध्ये उद्योजक आपले उत्पादन विशेष अतिथींच्या हस्ते अनावरण आणि लोकार्पण करू शकतील, ज्याची दखल मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रमामध्ये घेतली जाईल.

blog

सकारात्मक प्रेरणादायी उर्जा

व्यावसायिक आव्हानांवर मात करण्यासाठी अत्यावश्यक सळसळत्या उत्साहाने ओथंबून भरलेल्या वातावरणात लक्ष्यवेध उद्योग जत्राचे आयोजन असेल. जे प्रत्येक उद्योजकासाठी एक पर्वणीच असेल.